सेनगाव तालुक्यात महसुलच्या वरीष्ठ अधिकाऱ्याच्या अप्रत्यक्ष सहकार्यानेचअवैध वाळु वाहतुक शिंदे सेनेकडुन आरोप;तात्काळ अवैध वाळु वाहतुक थांबवा जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे मागणी

सेनगाव/विश्वनाथ देशमुख

 

सेनगाव तालुका परीसरातील पुर्णा व कयाधु नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उत्खनन व वाहतुक सुरु आहे.रात्रीच्या वेळी ट्रँक्टर,टिपर व अन्य वाहनाव्दारे वाहतुक सुरु असल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.हा सर्व प्रकार चालु असतांना महसुल विभागातील वरीष्ठ अधिकारी हित संबध जोपासण्याच्या उद्देशाने कानाडोळा करीत आहेत.कुठल्या ही प्रकारची कार्यवाही न करता अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करण्याचे काम करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेकडुन करण्यात आला आहे.तात्काळ अवैध वाळु थांबवुन या प्रकरणात महसुल अधिकाऱ्याचा सहभाग तपासुन कठोर कारवाई करुन चौकशी समिती नेमावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दि.२८ आँक्टोबर मंगळवार रोजी शिंदे सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,सेनगाव तालुका व परीसरातील पुर्णा व कयाधु नदी पात्रातुन रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उत्खनन व वाहतुक मागच्या एक महिन्यापासुन सुरु आहे.स्थानिक ग्रामस्थांनी यापुर्वी अनेक वेळा तक्रार करुन ही संबधीत वाहतुक थांबली नाही.रात्रीच्या वेळी ट्रँक्टर,टिप्पर व अन्य वाहनाव्दारे वाळु वाहतुक सुरु असल्यामुळे ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.हा सर्व प्रकार चालु असतांना महसुल विभागाचे वरीष्ठ अधिकारी हित संबध जोपासण्याच्या उद्देशाने कानाडोळा करीत आहेत.कुठल्या ही प्रकारची कार्यवाही न करता अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करण्याचेच काम करीत आहेत खाजगी व्यक्तींना हाताशी धरुन अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांना पाठबळ देण्याचे काम संबधीत अधिकारी करीत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे सेनगाव तहसीलदारांच्या आदेशाला काही कर्मचारी केराची टोपली दाखवण्याचे काम करीत आहेत.यापुर्वी ग्रामस्थ,पत्रकार यांनी याबाबत तक्रार केली असता कार्यवाही न करता खाजगी व्यक्तीकडुन वरीष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन धमकावल्याचे अनेक प्रकार झाले आहेत.अवैध‌ वाळु वाहतुक प्रकरणी महसुल अधिकाऱ्याचा सहभाग तपासुन कठोर कारवाई करण्या संदर्भात चौकशी समिती नेमावी,दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी,अवैध‌ वाळु वाहतुक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याची संपुर्ण मालमत्ता चौकशीखाली द्यावी तसेच अशी कृत्ये ही शासनाची बदनामी करणारी महसुल विभागावरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारी व कायद्याचा अवमान करणारी आहेत.त्यामुळे आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली समोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सेनगाव तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,प्रमोदराव नायक सवनेकर,संतोष माहोरकर,शाम रणबावळे,देविदास कांबळे,पांडुरंग हमाने,संदीप सरकटे,प्रकाश जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें