हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी राहत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासूवरही जीवघेणा हल्ला केला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात ही संतापजनक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन तिला बेदम मारहाण करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सासूही गंभीर जखमी झाली असून, या कृत्यानंतर पतीनेही काही अंतरावर जाऊन गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
नेमकी घटना काय?
कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील दीपाली पाईकराव हिचा विवाह काही दिवसांपूर्वीच विशाल डोंगरे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालल्यानंतर विशालने दीपालीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासामुळे त्रस्त झालेली दीपाली मागील काही दिवसांपासून आपल्या माहेरी खरवड येथे राहण्यासाठी आली होती.दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विशाल हा आपल्या सासुरवाडीला म्हणजेच खरवड येथे पोहोचला. त्यावेळी घरी त्याची पत्नी दीपाली आणि सासू कमलबाई या दोघीच होत्या. यावेळी विशाल आणि दीपाली यांच्यात वाद सुरू झाला. शाब्दिक चकमकीनंतर, तू माझ्यासोबत येण्याऐवजी माहेरी का आलीस, या कारणावरून संतापलेल्या विशालने बाजेच्या लाकडी ठोकळ्याने दीपालीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या भीषण मारहाणीत दीपालीचा जागीच मृत्यू झाला.या रक्तरंजित घटनेनंतर आरोपी जावयानेही गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. हिंगोलीच्या खरवड गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
http://youtube.com/post/Ugkxr5zHs7C43m0T8h4um3PS_RPdN351MOXt?si=QDXtOEdxk1pitfKG
हिंगोली जिल्ह्यांमध्ये भूकंपाचा धक्का
विशाल डोंगरे असं आरोपी पतीचं नाव असून, काही दिवसांपूर्वीच त्याच दिपालीसोबत लग्न झालं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दिपाली पतीसोबत न राहता माहेरी आईकडे राहत होती. तिला सासरी घेऊन
जाण्यासाठी विशाल खरवड गावात सासरवाडीत पोहोचला होता. यावेळी तू सासरी का येत नाहीस, माहेरी का राहतेस, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून विशालने बाजेच्या लाकडी ठोकळ्याने दिपालीच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात दिपालीचा जागीच मृत्यू झाला. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासू कमलबाई यांनाही विशालने गंभीर मारहाण केली. या घटनेनंतर विशालने जवळच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जखमी कमलबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. कळमनुरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.तसेच, हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासू कमलबाई यांच्यावरही विशालने प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पत्नीची हत्या आणि सासूला जखमी केल्यानंतर, विशालने घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.










