Nanded Blast | ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

टायरजवळील हवेच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत असले, तरी स्फोटाची तीव्रता पाहता ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर किंवा अन्य स्फोटक साहित्य होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

 

वर्दळीच्या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

उमरखेड-ढाणकी मार्गालगत शाळा, महाविद्यालये आणि मोठी वर्दळ असलेल्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा तैनात असतानाच दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.ब्लास्टिंगच्या साहित्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली?

 

सदर ट्रॅक्टरचा वापर विहिरी आणि खाणींमध्ये ड्रिलिंग करून ब्लास्टिंगच्या कामासाठी केला जात असल्याचे सांगण्यात येते. अशा कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनातून डिटोनेटरसह इतर साहित्याची वाहतूक केली जाते का, याबाबतही तपास केला जात आहे.नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलविले

 

स्फोटाचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक साजिद जहागीरदार आणि काँग्रेसचे सोनू खतीब यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना मालवाहू वाहनातून उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अविनाश बेले आणि साजेब खान यांना मृत घोषित केले. गंभीर जखमींपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून, अन्य जखमींवर उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

 

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील, ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मलकुवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

 

ट्रॅक्टरमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरले जाणारे स्फोटक साहित्य अथवा डिटोनेटर असण्याची शक्यता व्यक्त झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले. घटनेचा पंचनामा करून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

दुष्काळाच्या संकटात आडोळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाचा आधार हरपला अवघ्या ५८ गुंठे शेतीवर संसाराचा गाडा; नापिकी, मुलींचे शिक्षण, लग्न आणि कर्जफेडीच्या चिंतेने कुटुंब विवंचनेत

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

दुष्काळाच्या संकटात आडोळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाचा आधार हरपला अवघ्या ५८ गुंठे शेतीवर संसाराचा गाडा; नापिकी, मुलींचे शिक्षण, लग्न आणि कर्जफेडीच्या चिंतेने कुटुंब विवंचनेत