खरा कायदा वृत्तसेवा
सेनगाव/विश्वनाथ देशमुख
सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे विनापरवाना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी सेनगाव पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.वैभव सिद्धार्थ ऊबाळे रा.वटकळी असे कारवाई करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १४ इंच लांबीचा लोखंडी खंजीर जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२८ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री ८:३५ वाजेच्या सुमारास सेनगाव पोलीस ठाण्याचे पथक मौजे वटकळी परिसरात पेट्रोलिंग करत होते.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वैभव ऊबाळे हा संशयास्पद रितीने फिरताना पोलिसांना मिळून आला.पोलिसांनी तात्काळ त्याची अंगझडती घेतली असता,त्याच्याकडे एक विनापरवाना धारदार लोखंडी खंजीर आढळून आला.या खंजीराचे पाते १० इंच आणि लाकडी मूठ ४ इंच अशी एकूण लांबी १४ इंच आहे.कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस हवालदार राजूदास घनश्याम जाधव यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुरन ४६६/२०२६,कलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असून,या प्रकरणीचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजुदास जाधव करत आहेत.










