
हिगोंली:- ग्राहक बनून आले अन् आडत दुकानातून १ लाख ७० हजारांची रोकड पळवली!
वसमत शहरातील दादरा परिसरात सोमवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ५:३५ वाजता एका आडत दुकानातून १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचा बहाणा करून आलेल्या दोन इसमांनी ही चोरी केली असून, संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, दादरा परिसरातील अशोक काळे आणि बालाजी पाटील यांच्या मालकीच्या आडत दुकानावर सायंकाळी ५:३५ च्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. त्यांनी आपण ग्राहक असल्याचे भासवून दुकान














