
हिंगोली शहर पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त, एक आरोपी ताब्यात
हिंगोली | प्रतिनिधी हिंगोली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीवर हिंगोली शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. यावेळी करण बाळाजी वांगर (वय २४, रा. वांगरवाडा, हिंगोली) याला














