हिंगोली प्रतिनिधी
परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हँडबॉल स्पर्धेत हिंगोली जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करत सेनगाव येथील ए आर टि एम इंग्लिश स्कूल च्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश करत बिड संघास 11-3 गुणांनि पराभव करत सुवर्णपदक पटकावले व हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या संघात कर्णधार योगेश दळवी उप कर्णधार कौशल व्यास ऋग्वेद खनपटे स्वराज शिंदे प्रथमेश पजई अनुज पजई मयुर चव्हाण यांचा समावेश होता या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य रोलर हँडबॉल संघटना अध्यक्ष संतोष कंठाळे सचिव तुकाराम ठोंबरे गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी अध्यक्ष मा. ब्रिजगोपालजी तोष्णीवाल ए आर टि एम इंग्लिश स्कूल सेनगाव चे संचालक पंकजजी तोष्णीवाल प्राचार्य प्रविण कापसे डॉ हेमंत शिंदे प्रा.डा. शंकर पजई विकास कुंडलिक दळवी संतोष चव्हाण गजानन व्यास थिटे रहीम कुरेशी सोपान नाईक पवन राठोड रावसाहेब गेंडाफले यांनी शुभेच्छा दिल्या या संघास संतोष शिंदे अमोल घुगे यांचे मार्गदर्शन लाभले













