हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा… हिंगोली विधानसभा आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांचा इशारा आठ दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑

हिंगोली जिल्हयात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुर असून यामुळे सर्व समान्य नागरीक त्रस्त झाले आहेत.

 

रेतीमाफीया, मटका या अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला असून त्यातून कायद्याचे उल्लंघन होत आहे. या प्रकाराला सर्व समान्य नागरीक कंटाळले आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करून सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी भाजपाने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या मुदतीत अवैध व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा गुरुवारी ता. ३० एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

या संदर्भात भाजपाचे पदाधिकारी शिवाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रजनी पाटील, सुनीता मुळे, कृष्णा रुहाटीया, शशीकांत वडकुते, पवन उपाध्याय, वंदना गायकवाड, रजनीश पुरोहित यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

 

हिंगोली जिल्हयात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुर असून यामुळे सर्व समान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. रेतीमाफीया, मटका या अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला असून त्यातून कायद्याचे उल्लंघन होत आहे. या प्रकाराला सर्व समान्य नागरीक कंटाळले आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करून सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी अवैध व्यवसायावर कारवाई सुरुच आहे. त्यानंतरही कुठे अवैध व्यवसाय दिसून आल्यास त्याची तातडीने पोलिस दलास माहिती द्यावी त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. तर निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड यांनी या संदर्भात संबंधित विभागांना माहिती देऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे.

 

यावेळी बोलतांना शिवाजी मुटकुळे म्हणाले की, जिल्हयात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पुढील आठ दिवसांत अवैध व्यवसायावर कारवाई करून संपूर्ण व्यवसाय बंद करावे अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें