हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपुल चौपदरी रस्त्यासाठी 251 कोटी रुपये मंजूर नर्सी फाटा-महाराजा अग्रसेन चौक ते सावरखेडा चौपदरी रस्ता होणार

हिंगोली > हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपुल चौपदरी रस्त्यासाठी २५१ कोटी रुपये मंजूर!

हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपुल चौपदरी रस्त्यासाठी २५१ कोटी रुपये मंजूर!

हिंगोलीतील नर्सी फाटा – कयाधू पुल – महाराजा अग्रसेन चौक – जिल्हाधिकारी कार्यालय – खटकाळी रिंगरोड ते एनएच १६१ सावरखेडा चौपदरी रस्ता!केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट दिल्लीत आ. तान्हाजी मुटकुळे यांनी घेतली असता हिंगोली शहरातील महत्वाचा नर्सी फाटा – कयाधू पुल – महाराजा अग्रसेन चौक – जिल्हाधिकारी कार्यालय – खटकाळी रिंगरोड ते एनएच १६१ सावरखेडा हा चौपदरी रस्ता रेल्वे उड्डाण पुलासह २५१ कोटी रूपये मंजूर करण्यात आलेत.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत आ.तान्हाजी मुटकुळेंना मिळाले फलीत!हिगोली शहरात येणारा नर्सी फाटा ते महाराजा अग्रसेन चौक व एनएच १६१ सावरखेडा ते महाराजा अग्रसेन चौक हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. परंतु सध्या या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे व या रस्त्यावर असलेला कयाधू नदीवरील पुल व रेल्वे ओव्हर ब्रीज हे दोन्ही ही अरूंद असल्याने वाहतुकीची दिवसेंदिवस प्रचंड कोंडी निर्माण होत होती. कधी – कधी या वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघाताच्या घटना घडत होत्या. त्यामुळे अरूंद रस्त्याने वाहनचालक नेहमीच त्रस्त होत होते. कधी कधी या रस्त्यावरून गंभीर रूग्ण नेतांनाही वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या अख्त्यारित येत असल्यामुळे हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे सदर रस्ता सिमेंट काँक्रेट चौपदरीकरण करून दोन्ही पुलाचे कामे मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. तसेच या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) तयार करण्या करीता पाठपुरावा केला. २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट आ.तान्हाजी मुटकुळे यांनी घेतली असता सदर रस्ता सिमेंट काँक्रेट चौपदरीकरण व दोन्ही पुलासह मंजूर झाल्याचे ना. गडकरींनी सांगितले. या रस्त्यामुळे हिंगोली शहरातील महत्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. हिंगोलीच्या दृष्टीने महत्वाचे काम मंजूर झाल्यामुळे आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी हिंगोली शहर वासीयांच्यावतीने ना. नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें