क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे गोरेगांव अप्पर तहसील कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे गोरेगांव अप्पर तहसील कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन

राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचा हाती आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावल्या गेल्या असून लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वेळोवेळी केली आहे. या मागणीसाठी हिंगोलीत संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. मात्र त्यानंतरही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

 

 

दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन हमी भाव केंद्र तातडीने सुरु करून सोयाबीन विनाअट हमी भावाने खरेदी करावे, पिक विमा त्वरीत देण्यात यावा, वाढीव मंजूर झालेले 18,500 रुपये अनुदान तातडीने द्यावे या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आहे.राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी तसेच सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ता. 30 गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, यापुढील आंदोलन मुंबई येथे केले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें