पानकनेरगांव:सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात येथील वाईन बार चालकांचा घरपोच दारूचा प्रकार काही थांबता थांबेना बार मालकांचे चालते फिरते दुकान झाल्यामुळे गावकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हे सुसंस्कृत गाव आहे येथील १८ पगड जातीचे लोक नांदत असतात
सदरील मात्र वाईन बार चालकांच्या मनमानी कारभारामुळे गाव अक्षर:क्षा जेरीस आले आहे
पानकनेरगांव येथे शासन मान्यता असलेले ३ ते ४ वाईन बार दुकान आहेत त्यामधील एक ते दोन बार मालकांकडून सर्रास नियमाची पायमल्ली होतांना दिसून येत आहे
वेळेच्या आत उघडणे व्यक्तीचं वय वयोगट न बघणे सदर समोरच्या व्यक्तीचा फोन आला की घरपोच दारूचे पार्सल नेऊन देण्याचा हा प्रकार भलताच वाढला होता
सदर या संदर्भात मागील काही दिवसात बातमी प्रकाशित झाली होती या बातमीची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाईन बार चालकांची चौकशी केली सदर दोन दिवसापुरता हा प्रकार थांबला होता अधीकार्यांच्या कर्तृत्वावर गावकऱ्यांनी निस्वास सोडला
परंतु पुन्हा एकदा या क्रूत्याने तोंड वर काढले असून हा प्रकार राजरोसपणे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून पुन्हा सुरू आहे घरपोच दारू डिलिव्हरी करण्यासाठी बाईकचा वापर केला जात आहे
सदर एका बार मालक बहादराने तर थेट स्कुटीच्या डिकीमध्ये पार्सल नेऊन देण्याचा प्रकार खुलेआम सुरू केला आहे
या गैरप्रकरणी संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असता तुम्ही शासन नियम पाळून दारू तुमच्या काउंटरच्या आतच विका आमच्या मुलाला आणून देऊ नका
तर मूजोर बार चालकांनी आम्ही टॅक्स भरतो पार्सल बंद होत नाही काय करायचे ते करा असा सोशल व्हाट्सअप ग्रुप मध्ये मेसेज टाकून दादागिरीची भाषा वापरण्यात आली या कृत्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे १८-१९ वयोगटातील छोटे मुलं आपले व्यसनाधींच्या आहारी जातील की काय अशी चिंता लागून राहिली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर तात्काळ गोपनीय पाळत ठेवून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सर्वसामान्य गावकऱ्यांकडून होत आहे
बार मालकांच्या क्रूत्यामूळे संबंधित अधिकार्यांचा आशीर्वाद मिळतो की काय अशी चर्चा गावकर्यांत आहे












