सेनगाव/विश्वनाथ देशमुख
सेनगाव तालुक्यातील गणेशपुर शिवारात अवैध वाळुची वाहतुक करणारे टिप्पर सेनगाव पोलीसांनी पकडल्याची घटना दि.१७ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.एकास ताब्यात घेत टिप्पर,अवैध दोन ब्रास वाळुसह १५ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत सेनगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेनगाव पोलीसांच्या या मोठ्या कामगिरीमुळे अवैध वाळु माफीयात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील गणेशपुर शिवारात अवैध वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने सेनगाव पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के,पो.ह.थिट्टे,पो.ह.मस्के यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी गणेशपुर शिवारात गणेशपुर गावालगत एक अशोक लिलँड कंपनीचा पिवळा व ग्रे रंगाचा टिप्पर एम.एच.३८ एक्स ४४२५ या नंबरचे टिप्परमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या विना परवाना शासनाचा महसुल बुडवुन वाळु चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आले.स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या फिर्यादीवरुन विश्वनाथ त्र्यंबक वाठोरे वय ३८ टिप्पर चालक रा.म्हाळशी ता.सेनगाव यांच्या विरोधात सेनगाव पोलीसात गु.र.नं. ६५/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता सह कलम ४८(७),(८) गौण खनिज अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई पोलीस अधिक्षक डाँ.निलाभ रोहन,अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.जिवन मस्के हे करीत आ
हेत.












