शेत आखाड्यावरील मर्डरला अवघ्या दोन तासात वाचा फुटली , सख्खा भाऊ निघाला मारेकरी. हिंगोली पोलिसांची उत्कृष्ट कार्यवाही

हिंगोली प्रतिनिधी

 

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी पहाटे माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हट्टा अंतर्गत मौजे रांजना गावातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर त्यांचा मुलगा नामे नवनाथ नामदेव साळवे वय 25 वर्ष यांच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने जबर वार करून खून केला आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन हट्टाचे ठाणेदार सपोनि श्री संग्राम जाधव यांनी सदरची घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली त्यावरून पोलीस अधीक्षक श्री नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक श्री मोहन भोसले व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन श्वान पथक व फॉरेंसिकतज्ञ तसेच फिंगरप्रिंट यांचे पथक सुद्धा तात्काळ पाचारण करण्यात आले.

प्रथमदर्शनी सदरचा खून कोणी केला याबाबत कसलाही सुगावा लावत नाही लागत नव्हता.

पोलीस पथकाने अत्यंत बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर आडोशाला एक रक्ताने माखलेली कुऱ्हाड मिळून आली तसेच गावातील इतर गोपनीय माहिती घेतली असता मयत नवनाथ नामदेव सावळे व त्यांचा छोटा भाऊ गजानन नामदेव सावळे व 23 वर्षे यांच्यात घरगुती कामकाजाच्या वादातून व शेती कामाच्या कारणावरून नेहमी वाद होत होता परंतु मयताचा छोटा भाऊ नऊ गजानन नामदेव सावळे हा घटनास्थळावर हाजर असून तो पोलिसांना कसलाही संशय येऊ नये अशा प्रकारे वागत होता. परंतु पोलिसांच्या चानाक्ष नजरे समोरून त्याचे संशयस्पद वर्तन सुटले नाही, त्यावरून पोलिसांनी संशयित गजानन नामदेव साळवे या ताब्यात घेऊन विचारले असता प्रथमदर्शनी तो उडवा उडवीचे उत्तरे देत होता परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्याचा मोठा भाऊ नावे नवनाथ नामदेव सावळे यास मध्यरात्री डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केल्याचे सांगितले तसेच सदरचा खून हा शेतीतील कामे करण्याच्या कारणावरून व घरगुती वादातून केल्याचे सांगितले.

पोलिसांनी मयताचा छोटा भाऊ आरोपी गजानन नामदेव सावळे वय 23 वर्षे राहणार रांजणा यास ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार श्री संग्राम जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली. श्री कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली. श्री राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत. श्री मोहन भोसले पोलीस निरीक्षक स्थागुशा हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री संग्राम जाधव सपोनि पोस्टे हट्टा, श्री शिवसांब घेवारे सपोनि स्थानिक गुन्हे शाखा, श्री माधव जिव्हारे पोउपनि स्थानिक गुन्हे शाखा, श्री संजय केंद्रे पोउपनि पोस्टे हट्टा तसेच पोलीस अंमलदार हकीम शेख, संदीप सुरुसे, प्रीतम चव्हाण , गणेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

अवघ्या दोन तासात अनोळखी मर्डर उघड केल्याने पोलीस अधीक्षक यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें