मोठी बातमी! परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारचं टोकाचं पाऊल; जामिनावर सुटून घरी आला अन्…

परभणी प्रतिनिधी :-

परभणी संपूर्ण देशभरात पडसाद उमटलेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने सोमवार १२ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकताच तो जामिनावर सुटला होता.

परभणी शहरात १० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधान प्रतिकृती फोडून विटंबना करण्यात आली होती. घटनास्थळी उपस्थित जमावाने आरोपी दत्ता सोपान पवार यास मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर आंबेडकरी समुदायात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी आंबेडकरी संघटनांच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या घटनेत जखमी झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या विधीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे सदर प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणात आरोपी दत्ता सोपान पवार हा कारागृहात होता. मात्र काही काही दिवसापूर्वीच तो जामिनावर आला होता. आपल्या मुळ गावी मिर्झापूर येथे राहत होता. सोमवार १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी ग्रामीाणचे उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. जीवन राजगुरू, सुधीर डोंबे, शंकर हाके, शंकर जाधव यांनी भेट दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें