हिंगोली जिल्ह्यात बनावट देशी व विदेशी दारुची अवैध विक्री खुलेआम सुरु

 

 

  1. हिंगोली | दि. 16 डिसेंबर

 

हिंगोली तालुका पुरवठा गोडाऊनमध्ये सीलबंद अवस्थेत आलेल्या तांदळाच्या कट्ट्यांची सिलाई उधडुन करून तांदूळ कमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास पत्रकार बांधवांनी राशन गोडाऊनला भेट दिली असता हा प्रकार प्रत्यक्ष पाहायला मिळाला.

हिंगोली जिल्ह्यात बनावट देशी व विदेशी दारुची अवैध विक्री खुलेआम सुरु

 

सेनगाव/विश्वनाथ देशमुख

हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यापासुन मोठ्या प्रमाणावर बनावट देशी व विदेशी दारुची अवैध विक्री खुलेआम सुरु असुन या घातक रसायनयुक्त दारुमुळे अनेक तरुणांना आपला जिव गमवावा लागला असल्याने बनावट दारु विक्री तात्काळ बंद करुन विक्रेत्यावर व सखोल चौकशी करुन मुख्य सुत्रधारावर गुन्हे दाखल करावे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने दि.१६ डिसेंबर मंगळवार रोजी पोलीस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोली यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यापासुन मोठ्या प्रमाणावर घातक रसायनयुक्त बनावट देशी व विदेशी दारुची खुलेआम विक्री होत आहे.त्यामुळे अनेक तरुणांचे आरोग्य गंभीरपणे बिघडले आहे तर दुर्दवाने काही तरुणांना तर नाहक आपला जिव गमवावा लागला आहे.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत असुन दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायामुळे सामान्य नागरीकांचे जिव धोक्यात आले आहे.हि परीस्थिती कायम राहीली तर अजुन किती निरपराध तरुणांचे प्राण जातील हा अत्यंत चिंतेचा विषय बसला आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रस्ते,गावे व शहरामध्ये बनावट दारु विक्री करणाऱ्यावर तात्काळ मोठ्या प्रमाणावर संयुक्त धाड सत्र राबवावे,या अवैध विक्रीमध्ये सामील असलेल्या मुख्य सुत्रधाराचा सखोल तपास करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,भविष्यात अशी घटना घडु नये यासाठी जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाची नियमीत देखरेख व गस्त वाढवावी,अवैध दारुमुळे जिव गमावलेल्या कुटुंबाची शासन स्तरावर सहानुभुतीपुर्वक दखल घ्यावी.बनावट देशी व विदेशी अवैध दारु विक्री तातडीने थांबवुन संबधीतावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा जनहितासाठी शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,उप जिल्हा संघटक शंकर बबनराव घुगे,बालाजी हरीभाऊ जगताप आदीसह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें