सेनगाव/विश्वनाथ देशमुख
सेनगाव पंचायत समितीतील गंभीर गुन्ह्यातील शेतकरी पुत्रांना अटकपुर्व जामिन मिळवुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने दि.१५ डिसेंबर सोमवार रोजी हिंगोली येथे सेवानिवृत्त न्यायाधीश अँड.पि.के.पुरी व अँड.योगेश खिल्लारी यांचा सत्कार करण्यात आला.
दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सेनगाव पंचायत समितीत फेसबुक लाईव्ह करुन तेथील वास्तव सर्वासमोर का आनला याचा राग मनात धरुन संबधीत अधिकाऱ्यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,प्रविण मते,प्रहारचे जिल्हाप्रमुख विजय वानखेडे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले होते.परंतु शेतकरी पुत्रांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता,शेतकरी मोठ्या संख्येने उभे राहीले तसेच वकील बांधव सुध्दा उभी राहीली.हिंगोली जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले सेवानिवृत न्यायाधीश अँड.पि.के.पुरी साहेब व अँड.योगेश खिल्लारी यांनी संबधीत खटले विनामुल्य लढवुन शेतकऱ्यांच्या पोरांना अटकपुर्व जामीन मिळवुन दिला.त्याबद्दल गावगाड्यातील शेतकऱ्यांनी हिंगोली येथे पुरी साहेब व खिल्लारी साहेब यांचा शाल व श्रीफळ देत मोठ्या उत्साहात सत्कार केला यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी पुत्रांचे खटले विनामुल्य चालवणार-अँड.पि.के.पुरी
मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या अडी अडचणी,व्यथा याची मला जाणीव आहे.शेतकऱ्यांसाठी वारंवारं आंदोलन करणारे गजानन कावरखे व त्यांचे सहकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हा मला वाटले त्यांचे मनोधेर्य वाढले पाहीजेत त्यांना मदत करणे गरजेचे म्हणुन मी सर्वप्रथम फेसबुकव्दारे पोस्ट करुन हा खटला विनामुल्य चालवणार असल्याचे जाहीर केले होते.त्या नुसार मी माननीय न्यायालयासमोर युक्तीवाद केल्यानंतर मा.न्यायालयाने गजानन कावरखे व त्यांच्या सहकाऱ्याची अटकपुर्व जामीन दिली.या पुढील काळात आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुत्रावर खोटे गुन्हे दाखल झाल्यास कुठली ही फिस न घेता विनामुल्य न्यायालयात खटले चालवणार व कायदेशीर मदत करणार असल्याचे मत सेवानिवृत्त न्यायाधीश तथा प्रसिध्द विधीज्ञ अँड.पि.के.पुरी यांनी व्यक्त केले.


सेनगाव/विश्वनाथ देशमुख










