हिगोंली:-वसमत ते परभणी मार्गावर पिकअपचा रॉड तुटल्याने अपघात एक ठार, 10 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

हिगोंली:-वसमत ते परभणी रस्त्यावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिकअप वाहनाचा रॉड तुटल्यामुळे अपघातात एकजण ठार झाला असून १० जण जखमी झाले. त्यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील आरळ येथील काही ग्रामस्थ २६ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास एका पिकअप वाहनातून आरळ येथून वसमतकडे येत होते. वसमत-परभणी रस्त्यावर जवाहर नवोदय विद्यालया जवळ पिकअपचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याखाली उलटले.या अपघातात रामा बापु काळे (४५) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर अजय संजय काळे (३५), गंगाधर लक्ष्मण पवार (३२), लक्ष्मण शेषराव काळे (३५), हनुमान तक्त्या काळे (६०),कृष्णा रामा काळे (३५), ऋतीक महेपत काळे (२५), सुनिल अशोक पवार (१५), अशोक लक्ष्मण पवार (४०), नागेश दारासिंग काळे (२१), सिताराम देवराव पवार (२४) सर्व रा. आरळ या जखमींना तात्काळ वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमी पैकी अजय काळे, गंगाधर पवार व लक्ष्मण काळे या तिघांना पुढील उपचाराकरीता नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातासंबंधी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें