वाशीम शहर प्रतिनिधीअब्दुल अकीब
वाशीम ता.२३ऑल इंडिया मजलीस-ई-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे म्हणजे एम.आय.एम.चे माजी वाशीम शहराध्यक्ष अब्दुल अजीम अब्दुल सलीम यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षात रविवारी दि.२३/११/२०२५ सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रवेश केला आहे.जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी, जिल्हा समन्वयक डॉ सिद्धार्थ देवळे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत पाटील सुर्वे, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख वडजीकर,कासमभाई ह्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शेला गळ्यात घालून एम.आय.एम.चे माजी शहराध्यक्ष अब्दुल अजीम अब्दुल सलीम सह समस्त मंडळीचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी एम आय एम चे माजी शहराध्यक्ष अब्दुल अजीम अब्दुल सलीम यांच्यासह समस्त पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश झाल्याचे जाहीर केले. तद्वतच अब्दुल अजीम अब्दुल सलीम ह्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.
वाशिम शहरातील पुसद नाका स्थित शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि.२३) सायंकाळी सहा वाजता एम आय एम चे माजी शहराध्यक्ष अब्दुल अजीम अब्दुल सलीम यांच्या नेतृत्वात एम आय एम चे माजी शहर सचीव शेख वसीम शेख बशीर, माजी सचिव रेहान अली इरफान अली, माजी सदस्य अकील सय्यद शकील, कार्यकर्ता, अब्दुल नईम अब्दुल जलील, शेख रियाज शेख इरफान, शाहरुख अजिज शेख, अथर अहमद मस्तुर अहमद, शेख मोहसीन शेख बशीर, एजाज अली रहमान अली, अब्दुल आतिफ अब्दुल आतिक, अब्दुल अरबाज अब्दुल एजाज, सिद्धीक खान मुजफ्फर खान, शेख मोबीन भाई, आसिफ पैलवान अब्दुल करीम अब्दुल कलीम, अब्दुल रहीम, आदींनी प्रवेश केल्याची माहिती शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख अब्दुल अजीम अब्दुल सलीम यांनी दिली.













