करंजी बस स्टॉप ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थ समाधानात मा.आ.जवळगावकर यांच्या प्रयत्नांना यश

हिमायतनगर प्रतिनिधी| विकास गाडेकर

करंजी गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला करंजी बस स्टॉप ते गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या आमदारकीच्या काळात आमदार निधीतून तब्बल १ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते मार्गी लागण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे रखडलेले काम अखेर प्रत्यक्षात उतरले असून आज ते पूर्णत्वाकडे जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. खड्डे, चिखल आणि धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकाना रस्त्याचा मोठा अडथळा होत होता.सध्या सुरू असलेले काम गुत्तेदारामार्फत दर्जेदार साहित्य वापरून, नियोजनबद्ध व मजबूत पद्धतीने करण्यात येत आहे. रस्त्याची रुंदी, मजबुतीकरण याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने हा रस्ता दीर्घकाळ टिकाऊ राहणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.या विकासकामामुळे करंजी गावाचा मुख्य मार्गाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर तसेच तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.रस्ता पूर्ण झाल्यानंतर करंजी गावाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें