सेनगाव प्रतिनिधी
पोलीस स्थापना दिनानिमित्त सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दि.२ जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता विशेष उपक्रम राबविण्यात आला.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन तसेच शस्त्र प्रदर्शन माहीती देण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थी,विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोली पोलीस अधिक्षक निलभ रोहन,अप्पर पोलीस अधिक्षक साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा परीषद शाळा,एआरटीएम इंग्लीश स्कुल आदी शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते.या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन परीचय,शस्त्र ओळख,कामकाज तसेच बाल लैंगिक अत्याचार,बाल गुन्हेगारी,सायबर क्राईम,सोशल मिडीया,वाहतुक नियम,बालविवाह आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के,पो.उप नि.रविकुमार खंदारे,हे.काँ.बांगर,हे.काँ.जाधव,हे.काँ.मस्के,हे.काँ.थिटे,हे.काँ.पातपुते,वंजारी व अंमलदार यांच्यासह पत्रकार जगन्नाथ पुरी,दिलीप गायकवाड,निलेश महाजन तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













