नांदेड जिल्ह्यात झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. स्वतःच्या पोटच्या मुलांनीच आई-वडिलांचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्या केली होती.आई-वडिलांच्या शुभविच्छेदन अहवालानंतर खरं कारण समोर आलं आहे. तर रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमधून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. लखे कुटूंबातील चौघांनी टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती आला समोर आलीये.
लखे कुटूंबातील चौघांचा मृत्यू
मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते. 51 वर्षीय रमेश लखे आणि त्यांची पत्नी 44 वर्षीय राधा लखे या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. तर 25 वर्षीय उमेश लखे आणि त्याचा भाऊ 22 वर्षीय बजरंग लखे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर कटलेल्या अवस्थेत आढळले होते. दोन्ही भावाच्या आत्महत्येची घटना रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आली आहे.
आई-वडिलांची हत्या करून मुलांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आई-वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. इतर तांत्रिक तपास केला असता मुलांनी अगोदर आई-वडिलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. वडील रमेश लखे हे 25 वर्षापासून आजारी होते.
डोईवर कर्जाचा बोजा अन् उचललं टोकाचं पाऊल
वडिलांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सततच्या खर्चाला कंटाळून दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नातलगाच्या तक्रारीवरून याप्रकरणी दोन्ही मयत मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नी राधाबाई आणि मुलं बजरंग आणि उमेश हाती जे काम येईल, ते करून घरचा गाडा चालवत होते. परंतू दोन्ही मुलांचं लग्नाचं वय झालं होतं अन् खर्चाचा बोजा वाढत चालला होता.
पानटपरी चालकाला उठवून सुपारीची पुडी घेतली
घटनेच्या रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान उमेश आणि बजरंग मोटारसायकलवरून घरातून निघाले होते. त्यांनी गावातील एका पानटपरी चालकाला उठवून सुपारीची पुडी घेतली. “आम्हाला बाहेरगावी जायचे आहे,” असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
अवेटेड समरी दाखल
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी ही आत्महत्या केल्याने याप्रकरणी कुठलीही चार शीट न्यायालयात दाखल न करता अवेटेड समरी दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. आई वडिलांचा खून केल्यानंतर मुलांना पश्चाताप झाला असेल आणि त्यातून त्यांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या













