हाळद व्यापाऱ्याची १७.५० लाखांची फसवणूक; अंतरराज्य टोळी जेरबंद हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त

हिंगोली : हळद व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हिंगोली येथील हळद व्यापारी संजय राधाकिसन भुरकुड यांना आरोपींनी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून माल खरेदीचा बहाणा करून विश्वासात घेतले. त्यानंतर मालाची विल्हेवाट लावून व्यापाऱ्याची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींमध्ये शेख हसन शेख अक्रम कुरेशी (रा. चंद्रपूर, महाराष्ट्र), शेख जावेद शेख लियाकत व शेख अतीक शेख मोहम्मद (दोघे रा. बोधन, तेलंगणा) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण १७.५० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें