पुसेगावमध्ये जनतेच्या विकासासाठी तानाजीराव धरणे रिंगणात युवकांच्या मनातला राजा माणूस

सेनगाव (प्रतिनिधी):

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत तानाजीराव होणाजीराव धरणे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची घोषणा केली आहे. स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधा, शिक्षण, शेती आणि युवकांच्या रोजगाराच्या संधींवर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तानाजीराव धरणे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, गेल्या काही वर्षांपासून ग्रामविकास, जलसंधारण आणि शेतकरी कल्याण यांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. “जनतेचा विश्वास आणि विकास हेच आमचे ध्येय,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

पुसेगाव परिसरात त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

आडोळ गावचे जावाई आहे.

गावोगाव प्रचाराचा प्रारंभ करून विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडण्याची तयारी सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें