सेनगाव:-नातेवाईक महिलेस जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार एका व्यक्ती विरोधात सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

🔴खरा कायदा न्युज नेटवर्क⭕

सेनगाव:-नातेवाईक महिलेस दुचाकीवर गावाकडे नेत असतांना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी ता. ३ सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील एका गावातील महिला काही दिवसांपुर्वी परभणी जिल्हयातील तिच्या माहेरी आली होती. त्यानंतर ता. ८ ऑक्टोबर रोजी सदर महिलेस नेण्यासाठी तिचा नातेवाईक राजू धोतरे (जि. बुलढाणा) दुचाकी घेऊन आला होता. सायंकाळच्या वेळी राजू हा त्या नातेवाईक महिलेस व तिच्या दोन लहान मुलांना दुचाकीवर सोबत घेऊन गावाकडे निघाला होता.

 

दरम्यान, त्यांचे दुचाकी वाहन सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी मार्गावर आले असतांना राजू याने लघुशंक करण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवली. यावेळी त्याने त्याच्या जवळील मोबाईल दोन लहान मुलांना खेळण्यासाठी दिला अन लघुशंका करून परत आला. यावेळी मुले मोबाईल खेळण्यात मग्न असल्याचे दिसताच त्याने महिलेस मारहाण केली. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे महिला घाबरून गेली. सायंकाळची वेळ असल्यामुळे महिलेस प्रतिकार करता आला नाही शिवाय आरडा ओरड केल्यानंतर मदतही मिळाली नाही.यावेळी राजू याने त्या महिलेवर अत्याचार करून सदर घटना कोणाला सांगितली तर जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेस दुचाकीवर बसवून तिच्या घरी नेऊन सोडले. मात्र जिवे मारण्याच्या धमकीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वी तिने हा प्रकार भावाला सांगितल्यानंतर त्यांनी आज थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजू धोतरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, वंजारे यांच्या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेतला मात्र तो गावात सापडला नाही. त्यानंतर आता त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें