हिंगोली शहर पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त, एक आरोपी ताब्यात

हिंगोली | प्रतिनिधी

हिंगोली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीवर हिंगोली शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. यावेळी करण बाळाजी वांगर (वय २४, रा. वांगरवाडा, हिंगोली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दीपक मरस्के करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीनिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, पोउपनि गजानन साखरे तसेच हिंगोली शहर पोलीस पथकाने केली.

पुढील काळात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें