सेनगाव पोलीसांची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई दोन संशयीत आरोपी ताब्यात घेत सुमारे ५ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

सेनगाव प्रतिनिधी/

 

सेनगाव ते रिसोड महामार्गावर दि.१ एप्रिल बुधवार रोजी रात्री ११-३० वाजताच्या सुमारास एका हाँटेल जवळ शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा बेकायदेशीररीत्या चोरटी वाहतुक करणाऱ्या कारवर सेनगाव पोलीसांनी धडक कारवाई करीत दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेत सुमारे ५ लाख ३० हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन दोघांवर सेनगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यात छुप्या पध्दतीने व चोरट्या मार्गाने शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा एका कारव्दारे येत असल्याची गोपनीय माहिती सेनगाव पोलीसांना मिळाली होती.त्या माहीतीच्या आधारे स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांनी तात्काळ सेनगाव ते रिसोड महामार्गावर पथकासह सापळा रचला.यावेळी एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार एम.एच.२१ व्ही ९७३० एका हाँटेल बंद पडलेल्या हाँटेल जवळ संशयास्पदरीत्या आढळुन आल्याने ती अडवुन तपासणी केली असता,त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळुन आला.या कारवाईत सुमारे १ लाख ७० हजार ४०० रुपयाचा गुटखा तसेच ३ लाख ५० हजाराची कार व मोबाईल असा एकुण ५ लाख ३० हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.तर योगेश भास्करराव मेगुणे (वय २२) आणि पांडुरंग प्रभाकर तुरे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन,अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई गजानन सरकटे,राम मारकळ,पि.सी.डांगे,संतोष डांगे,नामदेव जाधव व चालक क्षीरसागर यांनी केली आहे.पो.काँ.तुकाराम मारकळ यांच्या फिर्यादीवरुन संबधीत आरोपी विरोधात सेनगाव पोलीसात गु.र.नं.१४६/२०२६ कलम १२३,२७४,२७५,२२३,३(५) भारतीय न्याय संहितासह कलम २६(२)(iv),२७(२),३०(२)(a),५९ अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास स.पोलीस निरीक्षक दिपक मस्के हे करीत आहेत.अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी सेनगाव पोलीस कठोर पावले उचलत असुन या कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें