कळमनुरी शहरात मध्यरात्री चोरी; घरातील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑

कळमनुरी शहरातील रेणुका नगर भागात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे गेट फोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळमनुरी शहरातील रेणुका नगर भागात राहुल साहेबराव राऊत हे वास्तव्यास आहेत. दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास ते आपल्या कुटुंबासह घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चैनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील अलमारी उघडून अलमारीत असलेले चार सोन्याचे ओम,दोन तोळे सोन्याचे दोन ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या पाच ग्रॅम सोन्याची पोत असे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चाळीस हजार रुपये असा मिळून सुमारे ₹१,३२,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

 

दरम्यान सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर राहुल राऊत यांनी तत्काळ कळमनुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे व फॉरेन्सिक टीम ने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत घटनेचा पंचनामा केला.राहुल राऊत यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे हे करीत आहे.

 

या घटनेमुळे रेणुका नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें