श्री शिवाजी विद्यालय रिसोड ची प्रतिकृती जिल्हास्तरावर द्वितीय –विज्ञानाच्या पंखाने विद्यार्थ्यांची उंच भरारी -ॲड.किरणराव सरनाईक

दिनांक 15 व 16 जानेवारी 2026 रोजी ज्ञानेश्वर माऊली विद्यालय कोंडाळा महाली येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थी जय गजानन देशमुख यांनी तयार केलेली प्रतिकृती यूज्ड ऑइल विथ टू बर्नर ला द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन ती प्रतिकृती राज्यस्तरासाठी पात्र ठरली आहे. जय देशमुख यांनी बनविलेल्या प्रतिकृतीची निर्मिती साठी विज्ञान शिक्षिका कुमारी अर्चना देशमुख शिक्षक संदीप पवार सहकारी धनंजय सरनाईक व विनोद बावणे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावर निवड झालेल्या प्रतिकृती बद्दल जय देशमुख यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी त्यांचा सत्कार केला तसेच शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री संजय देशमुख उपप्राचार्य श्री संजय नरवाडे पर्यवेक्षक श्री गजानन भसडे यांनी त्याचे कौतुक केले. विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जय देशमुख यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. जयने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे ग्राम वनोजा येथे सुद्धा मोठे कौतुक व सन्मान करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण होते असे उद्गार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. जय देशमुख यांनी मिळवलेल्या यशाबद्दल श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें