हिंगोली प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री.डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैद्य धंदे विरूध्द विशेष मोहीम राबविण्यात येत असुन दिनांक ०८/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहीती मिळाली कि, प्रॉपर हिंगोली शहरातील गाडीपुरा भागातील सात माता मंदीरासमोर स्वप्नील आप्पा उबाळे रा. गाडीपुरा हिंगोली ह.मु.एन.टी.सी. हा त्याचे राहते घरामध्ये गाडीपुरा हिंगोली येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व पान मसाला तंबाखु विक्री करणेकामी साठवलेला असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक घटनास्थळावर पोहचण्यापुर्वीच फरार झाले. सदर ठिकाणावरून महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला एकुण १,५५,९७०/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला, सुगंधीत व्हि-१ बिग तबाखु, प्रिमियम राजनिवास सुगंधीत पान मसाला, गोवा १००० गुटखा, रजनीगंधा पान मसाला मिळून आल्याने सदर आरोपींविरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री डॉ. नीलाभ रोहन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना, पो.नि.श्री मोहन भोसले, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो. नि.श्री. शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार सतीश जाधव, किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, सुरेखा आत्राम, महादु शिंदे, दिलीप बांगर शंकर हराळ, आकाश टापरे यांनी केली आहे.












