पोलिस वर्धापन सप्ताहाचे औचित्य साधत पोलिस अधीक्षक डॉ.श्री निलाभ रोहन सर,हिंगोली यांचे हस्ते भरोसा सेल द्वारे तडजोड करून संसार जुळलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंगोली येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेल सन २०२१ पासून कार्यरत आहे.
भरोसा सेलमध्ये सन २०२५ मध्ये वर्षभरात एकुण ८७७ विवाहित जोडप्यांचे कौटुंबिक वादाचे प्रकरणे (तक्रार अर्ज) प्राप्त झाले होते. . क्षूल्लक कारणावरून पती पत्नी यांचे मधील वाद विकोपाला जाऊन संसाराची घडी विस्कटण्यापर्यंत प्रकरण जाते. अशा जोडप्यांचे संसार सुरळीत चालावे यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज भरोसा सेल येथे समुपदेशन करून जास्तीत जास्त प्रकरणात तडजोड करून संसार सुरळीत करण्याचे प्रयत्न अधिकारी /अंमलदार यांचेकडून केले जाते .
पिडीत महिलांना विश्वासात घेऊन मानसिक आधार देण्याचे काम तसेच महिला व बालकांचे लैंगिक, मानसिक व आर्थिक स्वरूपाचे शोषण होत असेल तर यात बळी पडलेल्या महिला व बालकांना पोलिस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, विधी विषयक सेवा, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण आदी बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्याचे काम भरोसा सेल च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये जोडप्यांचे योग्य पद्धतीने समुपदेशन केल्याने सन २०२५ मध्ये एकूण २७८ कुटूंबाची तडजोड करून अनेकांचे संसार जुळवण्यात हिंगोली, भरोसा सेलला यश आले आहे.
अश्याच संसार सुरळीत सुरू असलेल्या जोडप्यांपैकी प्रतिनिधिक स्वरूपात एकूण १५ जोडप्यांचा आज रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री निलाभ रोहन सर यांचे हस्ते शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला…
या प्रसंगी बोलतांना मा. पोलिस अधीक्षक साहेब यांनी सर्व जोडप्यांना शुभेच्छा देत, समाजामध्ये वावरत असतांना हिंगोली जिल्ह्यामध्ये इतरही काही महिलांवर अत्याचार होत असतील आणि कौटुंबिक वाद होत असतील तर ते प्रकरण आपल्या मार्फतीने भरोसा सेल येथे दाखल करणेबाबत सर्वांना सूचित केले… तसेच उपस्थित जोडप्यांपैकी सुद्धा काही जणांनी भरोसा सेल मार्फत समुपदेशन केल्याने त्यांचा संसार कशा पद्धतीने सुरळीत झाला या विषयी मनोगत व्यक्त करून पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले…. केवळ भरोसा सेल येथे समुपदेशन केल्याने उच्चशिक्षित डॉक्टर जोडप्याचा संसार आता सुरळीत सुरू असून एका वयस्कर महिलेने सुद्धा भावूक होऊन अधिकारी व अंमलदार यांचे आभार व्यक्त केले.
सदर सत्कार सोहळ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केंद्रे, भरोसा सेल प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप(गोमाशे ), पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख, हेड कॉन्स्टेबल अरुणा पेंदोर, अनिता जाधव, सीमा पाटील, आरती साळवे इत्यादी उपस्थित होते.












