सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरा अन्यथा आंदोलन, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे

सेनगाव प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तात्काळ शिक्षकांची रिक्त पदे भरावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी दिला. शाळेला शिक्षक मिळावे यासाठी गावकऱ्यांच्या वतीने काही महिन्यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते मात्र लेखी आश्वासन देऊनही अद्याप पर्यंत शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे तात्काळ जर शिक्षकाची नेमणूक केली नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबले नाही तर लोकशाही मार्गाने शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे शाळा भरवण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें