हिंगोलीत एक कोटींची रोकड जप्त; मतदानाच्या आदल्या दिवशी खळबळ

🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑

 

हिंगोली : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा थरार शिगेला पोहोचला असतानाच हिंगोली शहरातील शेतकरी भवन परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. टाटा नेक्सन या चारचाकी गाडीमधून पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये असलेली 100, 200, 500 आणि 50 रुपयांच्या नोटांची बंडलं जप्त करण्यात आली.

 

उद्या, 2 डिसेंबर रोजी राज्यातील अडीचशेपेक्षा अधिक नगरपालिका व नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. प्रचाराची वेळ संपण्यास काही तास उरले असताना नेते-कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असतानाच, पैसे व साहित्य वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसही सतर्क आहेत.

 

त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने निवडणूक विभाग, पोलिस आणि स्थानिक प्रशासनात हालचाल सुरू झाली. पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान शेतकरी भवन परिसरातून या गाडीला थांबवून तपास केला. त्यावेळी बॅगमध्ये मोठी रोकड आढळून आली.

 

संपूर्ण रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित रक्कम एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, “कॅश बाळगण्यासाठी आमच्याकडे योग्य परवानगी आहे,” असा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे.

 

मात्र, निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही रोकड पडताळणी व प्राथमिक चौकशी पूर्ण होईपर्यंत ताब्यात ठेवण्यात आली आहे. गाडीतून मिळालेल्या कागदपत्रांचीही निवडक तपासणी सुरू आहे.

 

मतदानाच्या आदल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिस आणि निवडणूक विभागाकडून पुढील कारवाई सुरू

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें