🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑
केंद्रा बुद्रुक : सोयाबीनच्या गंजींना आग – ५ ते ६ लाखांचे नुकसान
अज्ञात व्यक्तींविरुद्ध संशय; शेतकरी अकील शहा यांचा मोठा तोटा
सेनगाव : तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथे काढणी करून साठवलेल्या सोयाबीनच्या गंजींना शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली. या आगीत सुमारे १६ एकरवरील दोन गंजी जळून खाक झाल्या असून, शेतकरी अकील शहा नूर शहा यांचे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अकील शहा यांनी विठ्ठल रखुमाई देवस्थानाची जमीन मक्तेदारीवर घेतली होती. काढणी झाल्यानंतर शेतात दोन गंजी करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गंजी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
१० नोव्हेंबर रोजी महसूल विभागाचे तलाठी देशमुख यांनी पंचनामा केला असून, पोलिस तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत द्यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
केंद्रा बुद्रुक : सोयाबीनच्या गंजींना आग; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान!
सेनगाव तालुक्यातील घटना — अज्ञात व्यक्तींविरुद्ध संशय, पंचनामा करून पोलिस तपास सुरू
🛑👆👆👆
🛑सविस्तर व्हिडीओ पाहा🛑
केंद्रा बुद्रुक (ता. सेनगाव) येथील १६ एकरवरील सोयाबीनच्या दोन गंजी जळून खाक
शेतकरी अकील शहा नूर शहा यांचे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान
विठ्ठल रखुमाई देवस्थानाची जमीन मक्तेदारीवर घेतली होती
९ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा संशय
तलाठी देशमुख यांनी १० नोव्हेंबर रोजी पंचनामा केला
ग्रामस्थांकडून आर्थिक मदत व दोषींवर कठोर कारवाईची मागणी












