🛑खरा कायदा न्यूज नेटवर्क 🛑
सेनगाव तालुक्यातील शिवनी खुर्द गावात सामाजिक संवेदनशीलतेचा उत्तम नमुना पहायला मिळाला.
चालण्यासाठी त्रस्त असलेल्या एका अपंग मुलीला पत्रकार महादेव हरण यांच्या पुढाकारातून तीन चाकी सायकल उपलब्ध करून देण्यात आली.मुलीचे वडील गजानन खराटे यांनी आपल्या अपंग मुलीच्या अडचणीची माहिती पत्रकार हरण यांना दिली. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत हरण यांनी पंचायत समितीचे माधव कोकाटे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक सायकल मिळवून दिली. अल्पावधीतच ही सायकल संबंधित मुलीच्या हातात पोहोचवण्यात आली.
आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पत्रकार महादेव हरण, नगरसेवक अमोल तिडके, पत्रकार केशव अवचार, विश्वनाथ गीते, राम पतंगे, भैय्या हरण आदी मान्यवर उपस्थित होते.अपंग मुलीच्या आई-वडिलांनी या संवेदनशील उपक्रमाबद्दल माधव कोकाटे व महादेव हरण यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले.
सामाजिक जाणिवेने प्रेरित अशा उपक्रमांमुळे प्रशासन व नागरिकांमधील समन्वय वाढून समाजात मानवतेचा संदेश पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.













