🔴खरा कायदा न्युज नेटवर्क⭕
हिंगोलीत साडी राजकारण पेटले
हिंगोली-:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणुकीच्या तयारीत आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे एकत्र उमेदवारी ठरवण्याच्या हालचाली करत आहेत.
दरम्यान, भाऊबीज सणाच्या निमित्ताने महिलांना साड्या वाटपाचे कार्यक्रम सुरू झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने गेल्या काही महिन्यांपासून साड्या वाटपाचे कार्यक्रम होत आहेत. या वाटपाला उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे.
या निषेधार्थ सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे काही दिवसांपूर्वी साड्यांची होळी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी हिंगोली शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात उद्धव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा साड्यांची होळी केली आणि शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांनी केले. या आंदोलनात मारोतराव खांडेकर, उद्धव गायकवाड, परमेश्वर मांडगे, आणि अमोल काले आदी पदाधिकारी सहभागी झाले.
यानंतर उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन साड्या वाटपाच्या कार्यक्रमांची चौकशी करून तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली. अन्यथा १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आ













