हिंगोलीत फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, १५ ते १६ जण गंभीर जखमी, अग्निशमन दलाची गाडी जळून खाक

हिंगोलीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगोलीत आगीची घटना घडली आहे. फटाके व्यापाऱ्याच्या घरी ठेवलेल्या फटाक्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.तर १५ ते १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील कपडा गल्लीतील गोपाल बासटवार यांच्या घरात असलेल्या फटाक्याला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कपडा मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलाची गाडी जळून खाक झाली आहे.या घटनेत बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाचा कर्मचारीही भाजल्याचे दिसून आले आहे. त्यांना उपचारासाठी लातूर येथे रवाना करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात झाली असली तरी परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची आमदार बांगर यांनी भीती व्यक्त केली आहे. ओट्यावर पडलेले दोन मृतदेह आम्ही उचलले, अशी आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

दुष्काळाच्या संकटात आडोळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाचा आधार हरपला अवघ्या ५८ गुंठे शेतीवर संसाराचा गाडा; नापिकी, मुलींचे शिक्षण, लग्न आणि कर्जफेडीच्या चिंतेने कुटुंब विवंचनेत

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

दुष्काळाच्या संकटात आडोळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; कुटुंबाचा आधार हरपला अवघ्या ५८ गुंठे शेतीवर संसाराचा गाडा; नापिकी, मुलींचे शिक्षण, लग्न आणि कर्जफेडीच्या चिंतेने कुटुंब विवंचनेत