हिंगोली : पालकमंत्र्यांची गाडी फोडू – गजानन कावरखे यांचा इशारा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर तीव्र टीका;

प्रतिनिधी : हिंगोली, ६ नोव्हेंबर

 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी सेनगाव येथे आदोळनात जिल्ह्याचे पालकमंत्री यांना थेट इशारा दिला आहे. “पालकमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्यात फिरून दाखवावे; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.

 

गजानन कावरखे यांनी वेळोवेळी हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले शेतकऱ्यांच्या पिक विमा ओला दुष्काळ कर्जमाफी असे अनेक प्रश्न त्यांनी मार्ग लावले आज झालेल्या सेनगाव येथे आंदोलनात हिंगोली जिल्ह्याचे हजारो शेतकरी उपस्थित होते

कावरखे यांनी पुढे सांगितले की, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. पिकांचे नुकसान, वीजपुरवठ्याची अनियमितता, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि शेतमालाला हमीभावाचा अभाव या प्रश्नांवर शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

 

सेनगाव शहरातील आंदोलनास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कावरखे यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका करत, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उग्र आंदोलनाचा इशाराही दिला.

 

या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. कावरखे यांच्या वक्तव्यावर प्रशासन आणि राजकीय नेते मंडळी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें