हिंगोलीत निवडणुकी मध्ये विकास गायब, वैयक्तिक हल्ले हजेरी! हिंगोलीत निवडणूक तापली

हिंगोली : पालिकेच्या निवडणुकीचा जल्लोष शिगेला पोहोचत असताना प्रचाराने मात्र अक्षरशः तापमान गाठले आहे. २ डिसेंबरला मतदान होत असल्याने राजकीय वाद–विवाद, आरोप–प्रत्यारोपांची मालिका जोर पकडत आहे. गेल्या काही दिवसांत भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्यातील खडाजंगी उफाळून येत असून मतदारांचे या राजकीय नाट्यावर चांगलेच लक्ष लागले आहे.मुटकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी संतोष बांगर हे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याची टीका करत, त्यांच्या कारणामुळे शहरात मटका-जुगार, वाळू माफिया आणि अवैध गुटखा विक्रीला उधाण आल्याचा आरोप केला. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याची भावनिक घोषणा करणारे बांगर, ५० कोटींच्या मोबदल्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.या आरोपांना प्रत्युत्तर देताना संतोष बांगर यांनीही तितक्याच बोचऱ्या शब्दांत पलटवार केला.

🔴👆👆👆👆👆👆

 

आ सतोंष बांगर यांची भर सभेत भाजप आमदार यांना शिवीगाळ

मुटकुळे घरात येऊ देण्याजोगा माणूस नाही, महिलांवर गैरवर्तन करतो, वाईट नजर टाकतो, अशा आरोपांची मालिका बांगर यांनी उघड केली. “हिंगोलीकरांनी अशा माणसाला घरात पाऊल ठेवू देऊ नये; आला तर चपलेने हाकलून द्यावे,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.यावरून संघर्ष आणखी टोकाला गेल्याचे दिसून येते. बांगर यांनी मुटकुळे यांची एक क्लिप आपल्याकडे असल्याचा इशाराही दिला. ती क्लिप बाहेर आली तर मुटकुळे यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा दावा त्यांनी केला.हिंगोलीच्या निवडणूक रणांगणात विकास मुद्दे बाजूला पडून वैयक्तिक आरोपांची धुरळाच उडत असल्याने मतदार मात्र ‘या पुढे काय?’ अशी उत्सुकता बाळगून आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें